असं म्हणतात की माणूस आपल्या निर्मितीवर सर्वात जास्त प्रेम करतो. कित्ती खरं आहे ना.. माझं माझ्या शब्दांशी वेगळंच नातं आहे. मी उदास असतांना ते मला हसवतात, निराश असतांना जगण्याचं बळ देतात.. प्रत्येक वेळी तेच तर सावरतात मला.. कधी एखादी चारोळी बनून येतात, तर कधी एखादी सुंदर कविता.. कधी कधी तर एखाद्या कथेच्या रूपात येऊन मला अमर्याद सुख देऊन जातात.. कोणी सोबत असो किंवा नसो शब्द मात्र मला सतत सोबत करतात.. माझे हे शब्द तुमच्याही मनाचा ठाव घेत असतील तर मला नक्की तुमचा मौल्यवान अभिप्राय देत राहा.. धन्यवाद..